काँग्रेस आय कमिटीची आढावा बैठक

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका काँग्रेस आय कमिटीची आढावा बैठक शुक्रवार दि.27 मे रोजी कुणबी भवन माणगाव येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. सदर बैठकीत आगामी काळात पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.
या आढावा बैठकीला नंदा म्हात्रे, नाना जगताप, मिलिंद पाडगावकर, पंकज तांबे,श्रीनिवास बेंडखळे, हरीश डोळस, राहुल होवाळ, दिनकर भालेकर, मार्तंड नाखवा, विलास सुर्वे, डॉ.नरेंद्र सिंह, जनार्दन मानकर,किशोर पाटील, राजेंद्र कोरपे, मंदेश मोरे, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version