बहिरोळे येथील काँग्रेस नेते विलास दशरथ थळे यांचे निधन

| सोगांव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील काँग्रेस नेते व ज्येष्ठ समाजसेवक तसेच रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे यांचे मोठे बंधु विलास दशरथ थळे (वय ६२) यांचे बुधवारी (दि.15) दुःखद निधन झाले.

निधनाचे वृत्त समजताच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहत कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली, ४ बहिणी, ३ भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.२४ राहत्या घरी होणार आहे. तसेच कोणताही दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Exit mobile version