महमार्गाच्या दुरवस्थाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसची निदर्शने

। गडब । वार्ताहर ।

मुंबई – गोवा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून, वडखळ ते माणगाव पर्यत महामार्गाची दुरवस्था झाली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे यांचे नेतृत्वाखाली वडखळ नाका येथे काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.

या वेळी जिल्हा चिटणिस परशुराम म्हात्रे, नरेंद्र सिंह, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, महेश जाधव, हिदयुत्तला कुवारे, प्रकाश मोकल, आर.जे.म्हात्रे, महेश जाधव, सदानंद मोरे, मारुती जाधव, गंगाराम साळवी, सदानंद मोरे, तुलशिदास देशमुख, किशोर भोसले, धीरज म्हात्रे, राजा म्हात्रे, संदीप पाटील आदींसह पेण, माणगाव तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आजारी रुग्णांना अलिबाग किंवा मुंबईला नेताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने या महामार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अन्यथा कोकणात जाणारा हा मार्ग अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे विलास सुर्वे यांनी सांगितले. तर शासनाने लवकरात लवकर या महामर्गाची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परशुराम म्हात्रे यांनी दिला.

Exit mobile version