मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीविरोधात काँग्रेसची शपथ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षातील अघोषित आणीबाणीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते व नेते यांनी शपथ घेत मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार आज संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षातील अघोषित आणीबाणीविरूद्ध कार्यकर्त्यांनी शपथ घेतली.


यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी.पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, तालुका अध्यक्ष योगेश मगर, माजी अध्यक्ष अनंत गोधंळी, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. प्रथमेश पाटील, प्रदेश सदस्य हर्षल पाटील, अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, सुकुमार भगत, अ‍ॅड. गणेश पाटील, जगदीश कवळे, मुज्जफर चौधरी, गणेश भगत, प्रशांत साटम, अ‍ॅड. प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड. सुजय घरत, आकाश राणे, नदीम बेबन, निलेशसिंग पुरोहित, योगेश घाडगे, कुणाल वाघेला, महेश ठाकूर, सुजाता पाटील, नयना घरत, आशा वारंगे, दिक्षा पाटील, इश्‍वरी ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version