कातकरीवाडीत वीजेच्या मीटरची जोडणी

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील विंधने कातकरीवाडीत तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते वीजेच्या मीटरचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या सप्तसुत्री उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी निसर्गा डाकी, वीज वितरण कंपनीचे अभियंता मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, बी.एम.ठाकूर, सुनील जोशी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, एकनाथ घरत, माजी सदस्य शक्ती घरत, तलाठी बलभीम लाटे, शिक्षक श्री.पाटील आणि चोगले आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version