संविधान महोत्सव उत्साहात

। पनवेल । वार्ताहर ।
आखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर असा 7 दिवस संविधान महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाचा समारोप खांदा कॉलनी येथे करण्यात आला. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचा कार्यक्रमातील प्रमुख वक्ते लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल नगर परिषदेचे मा. उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अनिल बंडगर, मा. नगरसेवक शिवाजीराव थोरवे, पुरोगामी युवक संघटना जिल्हाध्यक्ष देवा पाटील, शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष योगेश कोठेकर, युवा नेते वैभव गलांडे, वासुदेव गुरव उपस्थित होते.

Exit mobile version