कर्जत रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुल उभारा

मध्य रेल्वेकडे नगराध्यक्षांची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे दिशेकडे असलेल्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी येत्या आठवड्यात मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याचे आश्‍वासन मध्य रेल्वेचे व्यवस्थापक यांनी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी दिले आहे. तर, कर्जत रेल्वे स्थानकात मध्यभागी एक नवीन पादचारी पूल उभारण्यात यावा, अशी मागणी कर्जत नगरपरिषदेच्या वतीने मध्य रेल्वेकडे करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील पुणे दिशेकडे असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकात असलेला पादचारी पुल दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या महिन्यापासून बंद आहे. त्याचवेळी आणखी दोन महिने पादचारी पूल बंद ठेवला जाणार आहे. परिणामी, कर्जत शहरातील नागरिकांना उपनगरीय लोकलमधून आल्यानंतर रुळ ओलांडून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, काल (दि.14) कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मध्य रेल्वेला शहरातील नागरिकांच्या वतीने पत्राने जाब विचारला. तसेच कर्जत रेल्वे स्थानकात मध्यभागी नवीन पादचारी पुल उभारण्याची मागणी नगराध्यक्षा जोशी यांनी मध्य रेल्वेकडे कडे केली आहे.

नंतर तत्काळ चक्र फिरली असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक यांच्याकडून कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना फोन करण्यात आला. त्यावेळी गेली महिनाभर सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या महत्वाच्या कामासाठी येत्या आठवड्यात पॉवर ब्लॉक घेण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकातील पादचारी पूलाचे काम अल्पावधीत संपण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version