स्व. प्रभाकर पाटील यांनी अस्तित्वात आणलेल्या प्रा. आरोग्य केंद्राच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आले. कालावधी संपण्यापूर्वी या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रात येणारा प्रत्येक रुग्ण कसा बरा होईल, हा दृष्टिकोन ठेऊन ही वास्तू उभारण्यात येईल. निधीच्या उपलब्धतेनुसार पुढिल कामे पुर्ण करण्यात येईल. गिरीधरशेठ यांनी जागा दिल्यामुळे ही वास्तू उभारण्यात यश आले. त्यांच्या योगदानामुळे येथील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविता येईल. त्यामुळे त्यांच्या योगदानाला लाल सलाम. शेकापने दुसर्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. पक्षश्रेष्ठींनी कायमच नियमांत राहून काम करण्याचे सांगितले. कोणीही टिका केली तरी आपली संस्कृती न सोडण्याचे शेकापचे संस्कार आहेत. मात्र कधीतरी उच्चांक होतो. जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी होती, ती पूर्ण करण्यात आली. यामध्ये कोणतीही स्वार्थ बुद्धी नाही. अॅड. आस्वाद पाटील यांनी कोणती विकासकामे केली, हे समजून घ्यायला विरोधकांना सात जन्म घ्यावे लागतील. संयम, सद्सद्विवेकबुद्धी आणि सदाचाराचा विरोधकांमध्ये अभाव आहे. विरोधकांची नाटकं शेकाप सहन करणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
नियमांत राहून वास्तूची उभारणी – चित्रा पाटील
-
by Sayali Patil
- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय
- Tags: alibagchitra patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpolitics
Related Content
कोण होणार आमदार?; उत्कंठा पोहोचली शिगेला
by
Krushival
November 22, 2024
प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
by
Krushival
November 22, 2024
सुकेळी येथे कारची ट्रकला धडक; चालक गंभीर जखमी
by
Krushival
November 22, 2024
रमेश धनावडे यांचा सन्मान
by
Krushival
November 22, 2024
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
by
Krushival
November 21, 2024
बंद शाळा पुन्हा दुर्लक्षित
by
Krushival
November 21, 2024