मुठवली खुर्द येथे शौचालयांची उभारणी

कोलाड लायन्स क्लबची सामाजिक बांधिलकी

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मुठवली येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी, मनातील भक्तांना कौल देणारी देवी आई रत्नाई (भवानी माता) मंदिर सभागृह परिसरात येथे श्रध्देने येणार्‍या भक्तांसाठी सुसज्ज असे शौचालय उभारण्यात आले आहे. लायन्स क्लब ऑफ कोलाड-रोहा यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेल्या या शौचालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल 3231 ए 4 लायन्स क्लब ऑफ कोलाड-रोहा यांच्या वतीने तसेच जिल्हा उप प्रांतपाल एम.जे.एफ लायन संजीव सूर्यवंशी, लायन प्रवीण सरनाईक, लायन डॉ. नमिता मिश्रा मॅडम, लायन महेश सावंत, लायन विजय कुमार गणात्रा, लायन रवींद्र घरत, लायन डॉ. यशवंत चित्रे, लायन आर.पी.पांडे, लायन अरविंद घरत, लायन प्रियदर्शनी पाटील, कला प्रिंटर, ऐरोली क्लब, अलिबाग क्लब, कोलाड लायन्स मेंबर्स यांच्या विशेष सौजन्याने तसेच ग्रामस्थ मुठवली खुर्द, ग्राम पंचायत मालसई यांच्या सहकार्याने येथे उभारण्यात आलेल्या एक लाख नव्वद हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी जिल्हा प्रांतपाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ लायन अनिल जाधव जिल्हा उप प्रांतपाल पीएमजेएफ लायन एन आर परमेश्‍वरन उप प्रांतपाल एमजेएफ लायन संजीव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन रवींद्र लोखंडे यांनी केले, तर प्रास्तविक अध्यक्ष नरेश बिरगावले यांनी केले. यावेही प्रमुख मान्यवर लायन अनिल जाधव,एन आर परमेश्‍वरन,संजीव सुर्यवंशी, प्रियदर्शनी पाटील, डॉ यशवंत चित्रे, रवींद्र घरत यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रामस्थ म्हणून हभप राम सावंत यांनी लायन्स क्लबने गावासाठी केलेले हे महान कार्य असल्याचे सांगत ऋण व्यक्त केले. शेवटी लायन डॉ. श्याम लोखंडे यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Exit mobile version