। खोपोली । वार्ताहर ।
हुतामाकी कंपनीतून माल खाली करून बाहेर जाणार्या कंटेनर चालकाचा विचित्र अपघातात मृत्यू झाला.ही घटना बुधवारी कंपनी गेटजवळ घडली. वाहनाची तपासणीसाठी कंटेनर चालू स्थितीत ठेऊन चालक खाली उतरला होता. तो तसाच गाडीच्या मागे जात कंटेनरचे दार उघडून वॉचमनला तपासणीसाठी दाखवित असताना अचानकपणे गाडी पुढे जावू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंटेनर चालकाने तश्याच परिस्थितीत गाडी सावरण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाडी आणि गेट यामध्ये सापडल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. महमद सलमान रईस खान, (वय-23 वर्षे, ) उत्तरप्रदेश असे या मृत वाहनचालकाचे नावं आहे.या प्रकरणी खालापूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.