खोपटा पुलावर कंटेनर पलटी

। उरण । प्रतिनिधी ।

खोपटा पुलावर शुक्रवारी (दि.24) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालाची वाहतूक करणारा कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली. सदर अपघाच्या वेळी रस्त्यावरुन जाणारे मोटारसायकल स्वार थोडक्यात बचावले. खोपटा – कोप्रोली येथून माल घेऊन जेएनपीए बंदराकडे कंटेनर निघाला होता. खोपटा पुलावरून चढत असताना समोरील मोटारसायकलला वाचण्याच्या प्रयत्नात डावीकडे ओढल्याने सदर कंटेनर जागेवर पलटी झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला, मात्र अपघात झाल्याने उरण, जेएनपीएकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. हा अपघात सकाळी घडला. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.

Exit mobile version