विजेचा लपंडाव थांबवा

| माथेरान | प्रतिनिधी |

पर्यटनस्थळ माथेरान मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने याचा पर्यटनावर परिणाम होत असल्यामुळे विजेचा लपंडाव तात्काळ थांबावावा, अशी मागणी जनार्दन पार्टे यांनी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माथेरान येथील 22 केव्हीचा डिओ सतत जाऊन येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याबाबत त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता पारधी यांच्याकडे तक्रार सादर केली आहे. पाऊस नसतानादेखील माथेरान येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तेव्हा माथेरान येथील महावितरणचे उपअभियंता श्री. पारधी यांनी नेमका दोष कोठे आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. यापुढे डिओ जाऊन वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यास माथेरान येथील महावितरण कार्याल्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्री. पार्टे यांनी महावितरणला दिला आहे.

Exit mobile version