कंत्राटी कामगारांचे उपोषण तूर्त स्थगित

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपरिषद प्रशासनाने प्रलंबित निविदा प्रक्रियेसंदर्भात कराराची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे पत्र नवीन ठेकेदार कंपनीला दिल्यामुळे दि. 13 मेपासून कंत्राटी कामगारांनी बेमुदत उपोषण पुकारले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या सूचनेनुसार तात्पुरते आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

उरण नगरपरिषदेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना ठेकेदार मे.भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट यानी दि. 3 मेपासून बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले होते. त्याविरुद्ध दि. 13 मेपासून कंत्राटी दलीत, आदिवासी गोरगरीब कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. आपण व सहायक पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता ह्या कंत्राटी सफाई कामगारांना न्याय देण्याच्या मागणीवर नगरपरिषद प्रशासनाने नवीन ठेकेदार कंपनीला तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले पत्र पुढील करार पूर्तीकरिता दिले असल्याने चार दिवसांत प्रश्‍न निकालात निघतील असे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे तसेच देशातील युद्ध जन्य परिस्थिती विचारात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेन्द्र मिसाळ यांनी सदरहू आंदोलन चार दिवस स्थगीत करण्याच्या सूचना म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे पदाधिकारी अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनेचा आदर ठेवून सध्या सुरू असलेले आमरण उपोषण दि. 19 मेपर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे.

कामगारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अ‍ॅड. राजेंद्र मढवी , उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या उरण युनिटचे कार्याध्यक्ष मधुकर भोईर, सीमा घरत, वंदना पवार, माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, पत्रकार जगदीश तांडेल, मधूकर ठाकूर, प्रवीण पुरो, मनिष कातकरी, शेखर पाटील, सचिन वर्तक यांनी भेट दिली.

Exit mobile version