। अलिबाग । प्रतिनिधी ।
शाहू, फुले आंबेडकरांचे विचार जपणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक थोर महिलांचे योगदान राहिले आहे. या महिलांचा इतिहास आजच्या पिढीला समजला पाहिजे, त्यांचे विचार या पिढीपर्यंत रूजविणेे गरजेचे आहे. हा उद्देश समोर ठेवून महिला आघाडीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांना सावित्रीरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आज ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होताना खुप आनंद होत आहे, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.

चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या मार्फत सक्षम महिला तयार करण्यात आल्या आहेत. राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करण्याचे बळ त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मी होणार स्वावलंबी या उपक्रमातून महिलांना व्यावसायिक करण्यासाठी शिवणकला प्रशिक्षण घेण्यात आले आहे. यापुर्वी अनेक महिलांना मोफत प्रशिक्षण व शिलाई मशीन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांच्यासाठी रोजगाराचे दालन खुले केले आहे. महिलांना त्यांचा व्यवसाय आधुनिक पध्दतीने वाढवता यावा यासाठी डिजिटलचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न आहे. आजच्या संगणकीय युगात महिला खंबीरपणे उभी राहिली पाहिजे या दृष्टीने काम केले जात आहे. गावे, वाड्यांमध्ये काम करणार्या महिलांना या उपक्रमाच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील महिलांना सावित्रीरत्न पुरस्कार देताना खर्या अर्थाने आनंद होत आहे. कारण या महिलांची कामगिरी समाजात उल्लेखनीय आहे. या पुरस्कार सोहळ्यातून कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन आणखी दोन महिला घडल्या पाहिजेत, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीरत्न पुरस्काराने सन्मान राजकीय - स्वाती सतीश पाटील ( सरपंच ), क्रिडा - तनिषा मंदार वर्तक, शेती व्यावसायिक - सुचिता महेश वारगे, वकीली क्षेत्र - वर्षा अनिकेत पाटील, वैद्यकिय क्षेत्र- डॉ. शितल गणेश जोशी, महिला व्यवसायीका - प्रणिता विनोद पाटील, सोशल वर्क - वरदा मेहंदळे (वात्सल्य ट्रस्ट), पोलीस खाते - रेश्मा सुदाम डफळ, आरोग्य विभाग तृप्ती मुंकुद म्हाप्ते, व्यवसायिक - नुतन महेश म्हात्रे, कला- सई सचिन कांबळे, फॅशन डिझायनर - लक्ष्मी मुकादम, ग्लॅमर -अपूर्वा प्रविण ठाकूर, सोशल मिडीया फेमस फेस -नलीनी मुंबईकर, बँकिंग- वैशाली गोळे, खाद्य क्षेत्र -वैभवी चंद्रकांत राऊळ (भाकरीवाले पाटील लंच होम ), वैद्यकीय- डॉ. ओजस्विनी अतुल कोतेकर - तांबोळी, पत्रकारिता - श्वेता जाधव - वेलकर, ड्रोन प्रशिक्षण - स्वाती नागावकर, लोको पायल( रेल्वे ) - सायली राऊत नागाव, योगा - सिद्धी श्याम वाकडे, शैक्षणिक - अनिता पाटील, शेती व्यवसायीक - मंगल नवनीत झावरे, क्रीडाक्षेत्र - आशिरा अश्विन पाटील, उद्योजिका - उमा अनिरुद्ध आठवले, अंगणवाडी, सेविका - लक्ष्मी हिराजी काष्टे, आशा सेविका - साधना सुरेश वर्तक, कोळी व्यवसायिका - ज्योती दयाराम दांडेकर