एलएसपीएम महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

| अलिबाग | वार्ताहर |

लो.शि.प्र.मं. च्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोंढी येथे दि. 24 एप्रिल रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पदवी प्रदान करण्यासंदर्भात शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या लीना पाटील यांनी केले. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पदवी प्राप्त व विशेष श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, तसेच तीनही शाखांमधून अनुक्रमे प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांस रोख शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आले.

याप्रसंगी आर.सी.एफ कंपनीकडून कंपनीच्या सी.एस.आर फंडातून महाविद्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या सोलर सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.एफ. कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे तसेच आर.सी.एफ. कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव हरळीकर उपस्थित होते, तसेच लो.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष रवींद्र ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सहकार्यवाह जगन्नाथ पेढवी, कायम सदस्य अ‍ॅड.प्रवीण ठाकूर, खजिनदार राजेंद्र शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मनोहर म्हात्रे, संस्थेचे संचालक किरण ठाकूर उपस्थित होते.


महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना पाटील, आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. श्रद्धा पाटील, प्रा. सचिन गोंधळी, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी या समारंभासाठी उपस्थित राहून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतिका पाटील, प्रा. हर्षदा पुनकर, प्रा. प्रितिजा राऊळ, प्रा. दर्शना तोडणकर तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तृप्ती खोत यांनी केले.

Exit mobile version