पाली केंद्रात कॉपीमुक्त परीक्षा

| पाली/गोमाशी | वार्ताहार |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा बुधवारी (दि.21) रोजी सुरू झाली. सुधागड तालुक्यातील नांदगाव, बल्लाळ विनायक पाली, जांभूळपाडा, वावळोली आणि ग.बा. वडेर पाली या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाली हे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील 674 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी केंद्र प्रमुखाने सर्व पर्यवेक्षका त्याप्रकारच्या सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविकांत घोसाळकर, सुधागड गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, प्राचार्य भाऊसाहेब घोडके, केंद्रप्रमुख भागवत खेडकर,सर्व पर्यवेक्षक, पोलीस महिला कॉन्स्टेबल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version