अरे बापरे! पुन्हा कोरोनाचं संकट;2 कोटी लोक घरात कैद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. चीनमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. याच पार्श्‍वभूमीवर चीनमधील चेंगदू या मोठ्या शहरात लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे 2 कोटींहून अधिक लोकांना आपल्या घरात कैद व्हावे लागले आहे. गुरुवारी नैऋत्य सिचुआन प्रांताची राजधानी चेंगदू येथे कोरोना संसर्गाची 157 नवीन प्रकरणे समोर आली. त्यापैकी 51 रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.

चीनच्या ज्या शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत, त्या शहरांना सतत लॉकडाऊन करत आहे. चेंगदूची अंदाजे लोकसंख्या जवळपास 2 कोटी 10 लाख आहे. या सर्व लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आणि त्यांच्या घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रत्येक कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला अत्यावश्यक खरेदीसाठी बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत येथील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनावरील निर्बंध कधी हटवले जातील, याबाबत कोणतीही माहिती नाही.

Exit mobile version