मुंबई | वृत्तसंस्था |
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणार्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 17 जानेवारीपासून सुरु होणार होत्या. आता या परीक्षा 14 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. तर, पदवीच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या 31 जानेवारीपासून सुरू होणार होत्या. आता या परीक्षा 28 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. कदाचित कोरोना प्रकोप वाढल्यास या परीक्षाही ऐनवळी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असा अंदाज व्य होत आहे.