डोंबिवलीतील ओमिक्रॉन रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

। डोंबिवली । वृत्तसंस्था ।
डोंबिवलीतील नवा कोव्हिड व्हेरीयंट ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण असणार्‍या डोंबिवलीतील त्या व्यक्तीला डिस्चार्ज आज देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात 24 तारखेला हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबई मग दिल्लीमार्गे आणि दिल्लीतून मुंबई असा प्रवास करत ओलाद्वारे डोंबिवलीत आला होता.
या दरम्यान दिल्ली विमानतळावर करण्यात आलेल्या कोव्हिड चाचणीचा अहवाल मुंबईत पोहचल्यावर पॉझिटिव्ह असल्याचे त्याला समजले. आणि मग त्याने आपल्या घरच्यांना माहिती देत त्यांना आपल्या नातेवाईकांकडे राहायला पाठवले. आपल्याच घरी होम कॉरंटाईन असताना ताप आल्याने एका खासगी लॅबकडून त्याने पुन्हा आपली कोव्हिड चाचणी केली.
त्यामध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि लॅबमार्फत ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून परतल्याची माहिती केडीएमसी समजल्यावर शासनाची सूत्रे हालली. या व्यक्तीला तातडीने केडीएमसीच्या विलगीकरण केंद्रात दाखल करत त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईत पाठवण्यात आले. त्याच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आणि जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्याला ओमीक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यातील ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण आढळन आल्याने केडीएमसी आण राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली.
कोव्हिड रिपोर्ट आणि ओमीक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही सुदैवाची बाब म्हणजे या रुग्णामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नव्हती की त्याला कोणताही त्रास जाणवत नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची करण्यात आलेली कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली.

Exit mobile version