पेणमध्ये कोरोना चाचण्या युद्धपातळीवर

पेण | प्रतिनिधी |
पेणमध्ये होत असणारा कोरोोना पाटयाने संसर्ग पहाता पेण तालुका आरोग्य अधिकारी अर्पणा खेडेकर यांनी सरकारी कार्यालय तसेच पेण तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आशाताईच्या मदतीने कोवीड टेस्ट घेणे सुरु केले आहे.
तालुक्यात मागील पंधरा दिवसापूर्वी एकही कोरोना संसर्ग व्यक्ती नव्हती परंतु गेल्या आठवडाभरात कोरोनाचा प्रसार झपाटयाने होत असल्याने सुरक्षतेच्या दृष्टीने पेण तहसील कार्यालय, पेण प्रांत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, या ठिकाणी कोवीड 19 च्या टेस्ट केल्या जात आहेत. कारण या कार्यालयमध्ये अनेक व्यक्ती येत असतात व त्यांचा थेट संबंध या कार्यालयत असणार्‍या कर्मचार्‍यांशी येतो त्यामुळे मोठया प्रमाणात अधिकारी वर्गाला कोरोना लागण होत आहे. त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने या कार्यालयात टेस्ट सुरु आहेत. तसेच पेण तालुक्याचा प्रवेशद्वार समाजला जाणारा खारपाडा पूलावर देखील कोवीड टेस्ट केली जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी अर्पणा खेडेकर यांनी पेणच्या नागरिकांना आव्हान केले आहे की, सर्दी, खोकला, ताप या सारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत कोवीड टेस्ट करुन घ्यावी तसेच शासनाने घालून दिलेले सर्व नियम नागरिकांनी पाळावेत जेणेकरुन तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही.

Exit mobile version