आशाताई दिन उत्साहात साजरा
। पेण । वार्ताहार ।
आशा नावातच एक वेगळी ताकद आहे. त्यामुळे त्या नावाचे फुल फॉर्म काय आहे याचा आपण कधीच विचार करत नाही. शासनाने जे तुम्हा भगिनींना आशा हे नाव खुप छान दिलेले आहे. तुम्ही आशा आहात म्हणून मी तालुक्याचे आरोग्य छान सांभाळू शकते, असे प्रशंसोद्गार पेण तालुका आरोग्य अधिकारी अर्पणा पवार यांनी काढले.
पेण पंचायत समिती येथे आरोग्य विभागामार्फत पंचायत समिती सभागृहामध्ये आशाताई दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षयरोग विरुध्द आशाताईंना शपथ देण्यात आली तर विरंगुळाच्या दृष्टीने आशाताईंसाठी रांगोळी व कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी एम. एन. गढरी, पशु संर्वधन डॉ अर्चना जोशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्पणा सागर पवार, प्राथमिक वैदयकीय अधिकारी कामार्ली डॉ.मैत्री पाटील अदी उपस्थित होते.
यावेळी 149 आशाताईंना प्रशस्तीपत्रक दिले तर तसेच 7 गटप्रर्वतकांना देखील प्रशस्तीपत्रक तसेच राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त 4 आशाताईंना व 4 आरोग्यसेविकांना प्रशस्तीपत्रक देउन सन्मान करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धेमध्ये कोवीड लसीकरण, स्त्रीचे महत्व, व्यसनादिनता, जागतिक महिला दिन, जागतिक क्षय दिन अशा वेगवेगळया विषयांवर रांगोळया काढण्यात आल्या तसेच कविता वाचनामध्ये देखील नारी जातीचे सन्मान करणार्या कवितांचे वाचन झाले.
आपण आशा डे साजरा करत आहोत हा फक्त तुम्ही केलेल्या कामाच्या शाबसकीचा दिवस आहे. आरोग्य ग्रामीण यंत्रणे योग्यप्रकारे हातळत असतील तर त्या तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. आज वेगवेगळया स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेउन जो उत्साह दाखवलात त्याबाबत करावे तेव्हढे कौतुक कमीच भविष्यात असेच आपण काम करु या.