। खोपोली । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व मनोज सानप जिल्हा माहिती अधिकारी, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अयुब तांबोळी तहसीलदार, तहसील कार्यालय, खालापूर यांच्या सहकार्याने तहसील कार्यालय खालापूर येथे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा पथनाट्याच्या माध्यमातून जागर करण्यात आला. नागरिकांच्या उपस्थितीत प्रिझम संस्थेच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना, फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शिवभोजन योजना, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी करिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना, पीक कर्जाची वेळेत परतफेड करणार्या शेतकर्यांसाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याची योजना, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपलं शासनाने शेतकर्यांना केलेली मदत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अशा विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.