। सुधागड पाली । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पालीतील बल्लाळेश्वर मंदिरासमोर जागर शासकीय योजनांचा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांनी लोक कल्याणकारी योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून सांगितली.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तहसीलदार दिलीप रायण्णावार व पाली नगरपंचायत नगराध्यक्षा गीता पालरेचा यांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी शेखर राऊत, अंकिता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सादर केलेल्या पथनाlट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करीत असून सदर पथनाट्यात सागर पाटील, मनस्वी म्हात्रे, सोनाली वाघरे, नेहा म्हात्रे, सायली नाईक, साक्षी पाटील, सलोनी कोळी, वैष्णवी नागे, पूजा ठाकुर, पूर्वा नाईक आदी कलाकार सहभागी झाले होते.