नागरिकांपुढे नगरपालिका हतबल
पेण | प्रतिनिधी |
स्वच्छ,सुंदर पेण हे केवळ नावापुरतेच राहिल्याची परिस्थिती शहरात जागोजागी दिसत असून,शहरातील विविध मार्गावर नागरिकांकडून होत असलेल्या अस्वच्छतेमुळे नगरपालिकाही हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
गांधीमंदिर ते पेण प्रायव्हेट हायस्कूल या मार्गावर गांधी मंदिर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वनपाल निवास व कार्यालय, त्यापुढे विद्युत सहाय्यक तपासणी कार्यालय थोडा पुढे गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरण कार्यालय आणि मग पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालांचा. या रस्त्यावरून अधिकारी वर्गासह हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत असतात. अधिकारी वर्ग आपल्या चार चाकिंच्या गाडयातून जात असल्याने त्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत नाही. मात्र विद्यार्थी बिचारे दप्तराचा ओझे आणि दुर्गंधीपासून संरक्षण व्हावा म्हणून नाकाला रुमाल लावून ये-जा करत असतात.
गांधी मंदिर, प्रायव्हेट हायस्कूल रस्त्यावर नागरिक नगरपालिकेचे सर्व नियम ढाब्यावर बसून खुलेआम कचरा टाकत असतात . त्या ठिकाणी कावळे, कुत्री एवढया मोठया प्रमाणात तिथे असतात की विद्यार्थ्यांना त्या रस्त्यांनी जाणे देखील नकोसे वाटते. नगरपालिकेने वेळोवेळी बॅनर लावून देखील ते बॅनर काढून नागरिक फेकून देतात. त्यामुळे जो पर्यत कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यत नागरिकांच्यात सुधारणा होणार नाही एवढे नक्की. आज हजारे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. परंतु नागरिकांना त्याचे काही पडलेले नाही. स्वता:ची घर स्वच्छ करून रस्त्यावर कचरा टाकत असतील तर यापेक्षा दुरदैव दुसरे कोणतेच नाही. मात्र याकडे पेण नगरपालिका प्रशासनाने जातीने लक्ष देउन मुलांचे आरोग्य धोक्यात येणार नाही अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
पेण प्रायव्हेट हायस्कूल रस्त्यावर वेळोवेळी आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने काम करत असतो. रोजच्या रोज कचरा देखील नगरपालिकेकडून उचला जातो. कचरा टाकूनये म्हणून बॅनर ही लावतो. मात्र मुद्दामहून नागरिक तो बॅनर काढून त्याच्याच खाली कचरा टाकत असतात. आम्ही अशा नागरिकांविरूध्द कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच हा रस्ता स्वच्छ राहील यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूकच करणार. मंगळवारपासून आपल्याला रस्त्यावर घाण दिसणार नाही आणि मुलांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ
शिवाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी