उरण | वार्ताहर |
आदर्श शिक्षक कै. गजानन गणू खारपाटील यांचा तृतीय स्मृतिदिन चिरनेर येथील मातृपितृ छाया येथे संपन्न झाला.यावेळी माजी आ. मनोहर भोईर, पी पी खारपाटील, राजाशेठ खारपाटील,महादेव घरत,संतोष ठाकूर, प्रा एल बी पाटील, भरत म्हात्रे ,भास्कर मोकल, रमाकांत बंडा, पद्माकर फोफेरकर, गणेश म्हात्रे, गजानन वशेणीकर, दीपक खारपाटील, दत्तात्रेय म्हात्रे , सुरेश म्हात्रे, शशांक ठाकूर, राजेंद्र भगत, दर्शना माळी, आत्माराम मांडवकर, अशोक कांबळे, वसंत म्हात्रे, पुंडलिक कामोठकर , रमेश फोफेरकर, मनोज खारपाटील , भजनसम्राट हरिश्चंद्र गोंधळी, यांनी आदरांजली वाहिली. स्मृतीदिनाचे औचित्य साधून चिरनेर चिंचपाडा अंगणवाडी,केल्याचा माळ अंगणवाडी , खैरकाटी अंगणवाडी येथे खाऊचे वाटप करण्यात आले. वाचाल तर वाचाल हा खारपाटील गुरुजींचा संदेश विद्यार्थ्यांना होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव महामुंबई चे संपादक मिलिंद खारपाटील यांनी रायगड जिल्ह्यात तील काही वाचनालयाना 2 लाख रुपये हुन अधिक किमतीची पुस्तके भेट दिली आहेत.