जेएसडब्ल्यूकडून जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी
रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील साळाव जेएसडब्लू कंपनीकडून तळेखार ग्रामपंचायत हद्दीत तळेखार गावासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्ी मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.
कंपनीच्या सीएसआर विभागाच्या माध्यमातून तळेखार ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तळेखार गावामध्ये जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेएसडब्ल्यू साळाव कंपनीचे अधिकारी प्रवीण बंन्सल, राम मोहिते, राकेश चवरकर, प्रतिभा ठाकूर, श्री. अशोक सर, श्री. संगम, तळेखार सरपंच निर्मला वाघीलकर, गाव अध्यक्ष हरिश्चंद्र काटकर, पांडुरंग घाणेकर, गोविंद घाणेकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.