। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रामपंचायतीचे वतीने ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना कोरोना महामारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.
रहिवासी वर्गाच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर मोहिम राबविण्यात आल्याने रहिवासी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर राबविण्यात आलेल्या या मोहिमे प्रसंगी सरपंच रूपाली कोस्तेकर, उपसरपंच मानसी लोखंडे, सदस्य शांताराम महाडिक,माजी सरपंच वसंत मरवडे, माजी उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर, पो.पाटील खेळू मरवडे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मरवडे, सुभाष बामणे, मुरलीधर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या लसीकरण कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथील डॉ. आम्रपाली भालेराव, आशा गट प्रवर्तक प्रतिभा पोटफोडे, सायली मरवडे, तुप्ती महाडिक, भारती वरखले, किशोरी सावरकर, मिलन खामकर, अंगणवाडी सेविका प्रिया मरवडे, सुनीता लोखंडे आदी कर्मचारी वर्गानी मोलाचे सहकार्य केले. तर या लसीकरण मोहिमेतंर्गत कोव्हिल्डशिल्डचे 200 डोसचे लसिकरण करण्यात आले.