अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्र वाघोलीचे डॉक्टरांचा सत्कार वाघोली ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.अनिकेत म्हात्रे यांचा सत्कार कुलाबा वैभव संपादक बळवंत वालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. शैलेश म्हात्रे यांचा सत्कार जनसेवा पतसंस्थेचे हरिश्चंद्र वालेकर यांच्या हस्ते तर डॉ.अमोल ठाकूर यांचा सत्कार ग्राम पंचायत सदस्य दिनेश वालेकर यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र वालेकर यांनी केले.