पेेझारी । वार्ताहर ।
पोयनाड बाजारपेठेतील व्यापारी जितेंद्र जैन यांच्या बंबोली डेकोरेटर्स या उद्योगाला जोड म्हणून 1 सप्टेंबर रोजी शोरुम जोडून सुपर मार्केटची निर्मिती केली असून या सुपर मार्केटचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जितेंद्र जैन यांनी त्यांचे स्वगत केले. या कार्यक्रमास माजी आमदार पंडित पाटील, माजी उपसभापती अनिल पाटील, अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे-पाटील, बंबोली,जैन परिवार विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.