रायगड पोलीस दलासमोर कोरोनाचे आव्हान

पोलिस अधीक्षकांसह 11 अधिकारी 104 कर्मचार्‍यांना कोरोना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह जिल्ह्यातील 11 पोलीस अधिकारी आणि 104 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचाही समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांची अँटीजन चाचणी केली जात आहे. तसेच विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

पहिल्या लाटेदरम्यान रायगड पोलिस दलातील 595 कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर दुसर्‍या लाटेदरम्यान 250 कर्मचारी बाधीत झाले होते. दरम्यान, आतापर्यंत कोरोनामुळे 1 अधिकारी तर 5 कर्मचार्‍यांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

Exit mobile version