राणा दाम्पत्याला न्यायालायची नोटीस

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे. सरकारी वकिलांच्या अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, तुमचा जामीन का रद्द करू नये ? अशी विचारणा करून न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यास जामीन देताना काही अटी देखील घातल्या होत्या, मात्र जामिनानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर विविध विधानं केली गेली. त्यामुळे या अटींचं उल्लंघन झालं असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता न्यायालयाने राणा दाम्पत्यास नोटीस बजावली आहे.

Exit mobile version