जेएनपीटी | वार्ताहर |
मे ससून डॉक मत्स्योउद्योग सहकारी संस्थेच्या दिघोडे येथील फँक्टरीच्या उभारणीचे काम मनोज कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारांनी हाती घेतले होते.परंतु फँक्टरीचे काम पूर्ण होऊन ही सदर ससून डॉक मत्स्योउद्योग सहकारी संस्थेच्या चेअरमनी ठरल्या प्रमाणे कामांची रक्कम मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराला न दिल्याने पनवेल येथील वरिष्ठ दिवानी न्यायालयाने ससून डॉक मस्योउद्योग फँक्टरीला जप्तीची नोटीस शनिवार दि 9 आँक्टोबर 2021 रोजी बजावली आहे.
उरण तालुक्यातील दिघोडे येथे 2007 साली ससून डॉक मत्स्योउद्योग संस्थेच्या फँक्टरीचे मोठ्या गांजावाजा करत माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हस्ते उद्घाटन करून फॅक्टरी सुरू करण्यात आली होती.परंतु सदर फँक्टरीचे काम पुर्ण केल्यानंतर ही मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराला फँक्टरीच्या चेअरमननी झालेल्या कामाच्या बिलाची रक्कम देऊ केली नाही.यासंदर्भात मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारानी अलिबाग येथील जिल्हा, सत्र दिवाणी न्यायालयात न्याय मिळवा म्हणून 2007 साली दावा दाखल केला होता.
मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांच्या माध्यमातून वकिल म्हणून अँड एस.एन.जोशी यांनी काम पाहिले, पनवेल येथील वरिष्ठ सत्र दिवाणी न्यायालयाने 30 सप्टेंबर 2021 रोजी मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांच्या बाजूने निकाल दिला.तसेच ससून डॉक मस्योउद्योग सहकारी संस्थेने सदर मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराला 79 लाख 48 हजार 047 रुपये व त्यावरील व्याज या स्वरूपात झालेल्या बांधकामाचा मोबदला द्यावा आणि 7 आँक्टोबर 2021 रोजी ससून डॉक मत्स्योउद्योग संस्थेच्या चेअरमनी न्यायालयात हजर राहावे असे आदेश दिले.
पंधरा वर्षांच्या कालावधी नंतरही मनोज कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदारांच्या बाजूने निकाल लागला असताना ही ससून डॉक मस्योउद्योग सहकारी संस्थेने बांधकामाचा मोबदला देण्यासंदर्भात चालढकल पणा केला.त्यामूळे न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयातील कर्मचार्यांनी दि9 आँक्टोबर 2021 रोजी फॅक्टरीची जप्ती करून लिलावास काढण्याची नोटीस दिघोडे येथील ससून डॉक मस्योउद्योग सहकारी संस्थेच्या फँक्टरीवर लावली आहे.त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजून हा चर्चेचा विषय ठरला आहे.
ससून डॉकला कोर्टाची नोटीस
