नागलोली येथे कोविड लसीकरण कॅम्प

श्रीवर्धन | वार्ताहर |
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागलोली, वाळवटी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्वदेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागलोली येथे मराठा समाज मंदिरात कोव्हिड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. नागलोली व पंचक्रोशितील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून पहिला आणि दुसरा डोस घेतला. एकूण 170 जणांचा लसीकरण करण्यात आले.
यावेळी सरपंच विजय पडावे, उपसरपंच मिलन काते, आरोग्य सेविका वनिता देशमुख, आरोग्य सेवक नरेश खोत, आशा सेविका संजना ढापले, सपना आवेरे, स्वदेश आरोग्य समन्वयक ज्योती म्हात्रे, स्वदेश ऑपरेटर अलकेश शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश घोले, सचिन विचारे, अनिल खांडेकर इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version