स्कायवॉक होण्याआधीच कमानीला तडे

। पोलादपूर । वार्ताहर ।

पोलादपूर शहरामध्ये अंडरपास महामार्गावर ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ जोगेश्‍वरी देवस्थानाच्या कमानीला गेल्या काही दिवसांपासून तडे गेलेले दिसून येत आहे. प्रोकलेनचा धक्का लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

रस्त्याचा अंडरपासमध्ये प्रवेश होण्याच्या ठिकाणी पूर्व आणि पश्‍चिम बाजूचे सर्व्हिसरोड आणि गोव्याकडून येणारी मुंबईकडे जाणारी मार्गिका असे चारही रस्ते एकाच उंचीचे असलेल्या ठिकाणापासून पश्‍चिमेच्या दिशेला ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्‍वरी देवस्थानची कमान आहे. तालुका सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या देणगीतून बांधण्यात आली. महामार्गावरून ये-जा करणारे प्रवासी ह्या कमानीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येत असते.

याठिकाणी चौपदरीकरणाच्या कामातील काही वाहने आणि यंत्रांची ये-जा सुरू झाली. काही अंतर आतील बाजूला असलेल्या मोकळया जागेवरून ही यंत्र जात असताना कमानीला धक्का लागल्याने कमानीच्या पिलरला तडा जाऊन काही भाग कोसळल्याचे दिसून येत आहे. नवरात्रौत्सव काळात असंख्य भाविक या कमानीखालून श्री काळभैरवनाथ जोगेश्‍वरी देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात येणार असल्याने या कमानीपासून जिविताचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version