शेकाप महिला आघाडी शहरप्रमुख उमा आठवले यांनी दिले पोलिसांना निवेदन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहरातील रामनाथ येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना तसेच चिंचोटी येथील तरुणी वरील घटनेमुळे अलिबाग शहर तसेच तालुक्यात भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व दामिनी पथक करून पोलिसांचा धाक निर्माण करण्याची मागणी अलिबाग शहर शेकाप महिला आघाडीप्रमुख तथा महिला दक्षता समिती सदस्य उमा आठवले यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन उमा आठवले यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन दिले आहे. या निवेदनानुसार उमा आठवले यांनी म्हटले आहे की, 20 एप्रिल रोजी सायंकाळी रामनाथ येथील एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अलिबाग पोलिस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे माणूसकीला काळिमा फासणारी घटना टळली. सध्य स्थितीत मुलींचे सरंक्षण यावर आपण जिल्हयाचे प्रमुख या नात्याने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. चिंचोटी ता. अलिबाग येथे घडलेल्या घटनेचे गांभीर्य ही विदारक आहे. अलिबाग शहरामध्ये सद्या अनेक ठिकाणी कामे चालू असून अनेक मजूर झाले आहे पोलिस म्हणून आपण शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग व दामिनी पथक करून पोलिसांचा धाक निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार कारवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.