राम,कृष्णाच्या संस्कारामधूनच शिवचरित्राची निर्मिती

इतिहास संशोधक बलकवडे यांचे प्रतिपादन
। कर्जत । प्रतिनिधी ।
प्रभू रामचंद्रांचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाच्या राजनीतीचा संगम म्हणजे शिवचरित्र असे प्रतिपादन भारत संशोधन इतिहास मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांनी येथे केले.
कर्जत शहरातील रॉयल गार्डनच्या सभागृहात राहुल वैद्य लिखित श्री शिवकाव्य या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले होते. .यावेळी आ प्रशांत ठाकूर ,नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, परेश ठाकूर, मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका प्राची मोघे, इतिहास अभ्यासक सागर सुर्वे, जितेंद्र ओसवाल, भाई गायकर, मोहन ओसवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बलकवडे पुढे म्हणाले, औरंगजेब हा जगातील कोणत्याही मानवी समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही. जर याला आदर्श ठरविण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आदर्श ठरू शकणार नाहीत, तुमचा समाज, तुमचा धर्म, तुमची संस्कृती आदर्श ठरू शकत नाही.फ असे स्पष्ट करून मआज प्रकाशित केले ते श्रीशिवकाव्य सर्वसामान्यांना नक्की मार्गदर्शक ठरेल. ते नक्की जगप्रसिद्ध होईल. असा विश्‍वास व्यक्त केला.
सुरुवातीला राहुल वैद्य आणि रीना वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनतर मश्री शिवकाव्यफ या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात वैद्य यांनी श्री शिवकाव्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली? हे सांगितले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समीर खरे यांनी केले. केदार आठवले यांनी सादर केलेल्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी मकरंद पाध्ये, दीपक बेहेरे, मंदार मेहेंदळे, अविनाश कोळी,पराग बोरसे, अनुपमा कुळकर्णी, अभिषेक सुर्वे, रणजीत जैन, सचिन ओसवाल, मुकेश सुर्वे, राजीव मुळेकर, डॉ. आशुतोष कुळकर्णी, गणेश वैद्य, प्रकाश पटवर्धन, योगिता राणे, अक्षया चितळे, स्मिता जोशी, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, निलेश चौडिये, संतोष दगडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version