सर्वेश्‍वर क्रिडा मंडळ नवीन देहेन आयोजित क्रिकेट स्पर्धा

खेडजाई ताडवागले अंतिम विजेता
। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड ग्रामपंचायत हद्दीतील नवीन देहेन येथे सागर गड आंडरार्म क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताने अध्यक्ष अविनाश पाटील भाकरवड व उपाध्यक्ष तुषार पाटील मेढेखार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते
या सामन्यासाठी उद्घाटक म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील, माजी उपसरपंच भूषण चवरकर, अरुण पाटील, ग्रामस्थ मंडळ नवीन देहेनचे अशोक पाटील, सुनील पाटील, जनार्धन पाटील या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या सामन्यासाठी प्रथम क्रमांक भूषण चवरकर रुपये सात हजार, द्वितीय क्रमांक सुनील पाटील पाच हजार तृतीय क्रमांक शरद राऊत तीन हजार ,चतुर्थ क्रमांक दीपक म्हात्रे तीन हजार, तर आकर्षक चषक प्रथम ते चतुर्थ अरुण पाटील यांच्या कडून तर स्मृती चषक स्व अर्जुन गोरखनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रेमनाथ पाटील यांज कडून सामन्यातील बक्षीसे रोशन जुईकर कडून देण्यात आली होती.
या सामन्यात अंतिम विजेता खेडजाई ताडवागले, व्दितीय रुपेश इलेव्हन भाकरवड ब, तृतीय हिपहॉप बॉईज श्रीगाव, तर चतुर्थ ए सी सी देहेन यांनी पटकावला. या सामन्यात मालिकावीर सौरभ मांडवकर ताडवागले, उत्कृष्ट फलंदाज जयेश पाटील भाकरवड , उत्कृष्ट गोलंदाज कल्पेश पाटील देहेन यांना देण्यात आले या सामन्यात समालोचन रविंद्र पाटील भाकरवड व चैतन्य राऊत देहेन यांनी केले. या सामन्यासाठी अथक परिश्रम सर्वेशवर क्रिडा मंडळ नवीन देहेन व ग्रामस्थ मंडळ नवीन देहेन या घेतले
फोटो, सर्वेशवर क्रिडा मंडळ नवीन देहेन येथे आयोजित क्रिकेट सामन्यात उद्घाटन करताना जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील व उपस्थित मान्यवर मंडळी
छाया जीवन पाटील भाकरवड

Exit mobile version