गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित क्रिकेट स्पर्धेत

फुलाईदेवी सासवणे संघ विजयी

| सोगांव | वार्ताहार |
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील गावदेवी क्रीडा मंडळाने प्रथमच गावदेवी चषक 2023-24 ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावाधीत या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांचे उद्घाटन शुक्रवारी 6 जानेवारी रोजी सकाळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी मापगाव सरपंच उनिता थळे, उपसरपंच अनिता शिंदे, माजी सदस्य अनिल जाधव, चंद्रकांत खोत, युवा नेता सूचित थळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फुलाईदेवी सासवणे व गावदेवी मापगाव यांच्यामध्ये लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत फुलाईदेवी सासवणे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक 51000 हजार रुपये व चषक पटकावला, तर गावदेवी मापगाव संघाने द्वितीय क्रमांक 31000 हजार रुपये व चषक पटकावला, तसेच बीसीसी आगरसुरे संघाने तृतीय क्रमांक 21000 हजार रुपये व चषक पटकावला.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजचा मान बीसीसी आगरसुरे संघाचा आशिष म्हात्रे याला देण्यात आला, तर उत्कृष्ट गोलंदाजचा मान फुलाईदेवी सासवणे संघाचा विक्रम थळे याला देण्यात आला. तसेच मालिकावीरचा मान गावदेवी मापगाव संघाचा नितेश राऊत याला देऊन त्याला सायकल देण्यात आली. यावेळी शिस्तप्रिय संघ म्हणून बीसीसी आगरसुरे संघाचा सन्मान करण्यात आला.

स्पर्धेच्या शेवटी बक्षीस वितरण समारंभ रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश ठाकुर, शिवसेना नेते(उद्धव ठाकरे गट) आमिर उर्फ पिंट्या ठाकुर, चांदोरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मापगाव उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, विवेक जोशी, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, बहिरोळे पोलिस पाटील प्रफुल्ल थळे, सूचित थळे, किशोर सातमकर, संजय शिंदे यांच्यासह मापगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत क्रिकेट समालोचक म्हणून यश मापगावकर, इमरान बुखारी, सुहास फाटक यांनी उत्तमरीत्या काम केले, तर समारंभाचे सूत्रसंचालन यश मापगावकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व मापगाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version