झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा

स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली विजयी


| पोयनाड | प्रतिनिधी |


झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद चवरकर स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली संघांनी लावास क्रिकेट स्पोर्ट्स पनवेल संघावर विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारत स्पोर्टी-गो संघांनी 40 षटकांन मध्ये 8 गडी गमावत 276 धावा धावफलकावर नोंदवल्या, सलामीचा फलंदाज दिव्यांश चौधरी यांनी 57 आदर्श सिंग तर अर्णव मिरगे यांनी चौफेर फटकेबाजी करत सर्वाधिक 87 धावा काढल्या.

लावास पनवेल संघाकडून साईश म्हात्रे यांनी 3 व आयुष पाटील यांनी 2 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तर देतांना पनवेल संघांनी सर्व गडी गमावत 35 षटकांमध्ये 106 धावसंख्या उभारली,साईश म्हात्रे यांनी सर्वाधिक 27 धावा काढल्या.स्पोर्टी-गो कडून आदर्श सिंग यांनी 5 व जयंद्र पावसकर यांनी सुरेख गोलंदाजी करत 4 फलंदाज बाद केले. स्पोर्टी-गो संघांनी सामना 170 धावांनी जिंकला. अष्टपैलू खेळ करणाऱ्या आदर्श सिंग याला सामनावीर, साईश म्हात्रे स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, इमर्जिंग प्लेअर अर्णव मिरगे, अनय कांबळे तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून यश देवकर यांना परमेश्वर जाधव, मंगेश कदम,नरेंद्र पावसकर, गौरव कदम, हेमलता सामंत कनिष्का लाखवांनी,संकेश ढोले,आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version