समुद्रकिनारी रंगल्या क्रिकेटच्या स्पर्धा

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड शिवसेना उबाठा कोळीवाडा विभागातर्फे मर्यादित 4 षटकांच्या तालुकास्तरीय टेनिस बॉल स्पर्धा सोमवारी (दि.22) मुरूडच्या समुद्रकिनारी घेण्यात आल्या होत्या. दि 19 ते 22 जुलै असे चार दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील 24 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये जय गणेश संघ राजपुरी यांनी प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक कालभैरव कोळीवाडा संघाने मिळविला आहे.

मुरूडमध्ये दरवर्षी कै. नंदकुमार केंडू यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कोळीवाडा शिवसेनेच्यावतीने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेतील पारितोषिके वितरण माजी नगरसेवक तथा माजी पाणी पुरवठा सभापती प्रमोद भायदे, माजी उनगराध्यक्ष बाळकृष्ण गोंजी, आदेश दांडेकर, विजय वाणी, प्रशांत कासेकर, यशवंत सवाई, कृणाल सतविडकर, विजय सुर्वे, रुपेश जामकर आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जय गणेश व कालभैरव कोळीवाडा या संघांना प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी एक बोकड आणि चषक अशी पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी मुरूड कोळी वाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात प्रथम श्रेणी गुणवत्ता प्राप्त करणार्‍या जान्हवी गोंजी, प्रितिका हवालदार, सार्थक गोंजी या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपविभाग प्रमुख अमित गोंजी, योगेश चोगले, शक्ती फेंगडू अन्य युवा कार्यकत्यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले.

Exit mobile version