सूर्यकुमार लालबागचा राजाच्या चरणी

| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय संघातील क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजाला भेट दिली. यावेळी सूर्यकुमार आणि तिलक वर्मा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना दिसले.

अनेक सेलिब्रेटींप्रमाणे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील यंदाचा गणेश उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला. काही सेलिब्रेटी क्रिकेटपटूंनी लालबागच्या राजाचं दर्शन देखील घेतलं. भारतीय संघातील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि नुकतेच भारताकडून टी 20 आणि वनडे पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने लालबागच्या राजच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला.

Exit mobile version