कार चालकाविरुद्ध गुन्हा

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
बेदरकारपणे कार चालवून समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत, अपघात करुन त्यावरील दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत इंगळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे. या अपघातात रोशन चांदळे आणि रजनी चांदळे अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार सावंत करत आहेत.

Exit mobile version