मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव दत्तनगर येथील घटनेत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार, (दि.16) मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद सागर काशिनाथ दाते (29) रा. डोंबिवली पूर्व मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील आरोपी राज वर्मा (पूर्ण नाव गाव माहीत नाही) याला नाचताना डीजेवाला मुलाचा धक्का लागला. या गोष्टीचा आरोपी राज वर्मा व राहुल (पूर्ण नाव गाव माहीत नाही) यांना राग येऊन ते डीजेवाला मुलास मारहाण करीत असताना फिर्यादी सागर काशिनाथ दाते हे सोडविण्यासाठी गेले असता दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून तसेच शिवीगाळी व ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपी राज वर्मा याने कोणत्यातरी टोकदार वस्तूने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप करीत आहेत.

Exit mobile version