| खालापूर | प्रतिनिधी |
आरोग्य केंद्रात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला अश्लील इशारे करणाऱ्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर आरोग्य प्राथमिक केंद्रात रात्रपाळीसाठी असलेल्या परिचारिकेला राम आलकुंठे (42), रा. साबाईनगर खालापूर याने अश्लील हातवारे केले होते. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







