। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील सिडको विकसित करीत असलेल्या करंजाडे वसाहतीतील रस्त्यावर जिकडे बघाल तिकडे खड्डेच-खड्डे आहेत. या खड्डयांना वाहनचालक सुद्धा त्रासले आहेत. मात्र या पडलेल्या खड्डयांकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने करंजाडे नोड शिवसेना पक्षाच्या वतीने करंजाडे वसाहतीतील खड्ड्यांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.
सिडकोच्या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहेत. जिकडेतिकडे खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे. त्याला करंजाडे वसाहत सुद्धा अपवाद नाही. बहुतांशी सेक्टरमध्ये रस्ते सुस्थितीत नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवाशी, वाहन चालक हे गेल्या काही महिन्यापासून त्रस्त आहेत. त्यामुळे अडचणीत आणखीनच भर पडली आहे. एकीकडे सिडको स्मार्ट सिटीच्या गप्पा मारत आहे. आणि दुसरीकडे रस्त्यांची ही अशी स्थिती आहे. त्यातच या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने करंजाडेतील काही ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. सिडको या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील रस्ते दुरुस्तीसाठी सिडकोकडून ठेकेदाराची निवड करण्यात आली आहे. मात्र त्या ठेकेदाराने खड्डे दुरुस्तीसाठी डांबरच नसल्याचे कारण देत आहे. मात्र या डांबराच्या तुटवड्यामुळे एखाद्या वाहनचालकाचा अपघाता झालाच तर सिडको याची जबाबदारी घेणार का?
करंजाडेतील रस्त्यावर जमलेली गर्दी पाहता पण परंतु जरा थांबा. रस्त्यावर बसलेले नागरिक केक कापत आहे तो साजरा करतात खड्ड्यांचा वाढदिवस. खड्यानी त्रस्त असल्यामुळे करंजाडे येथील गौरव गायकवाड शिवसेना करंजाडे शहर प्रमूख यांनी आपल्या सहकार्यासोबत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी सिडको प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत केक कपात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा झाल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱयांना लवकरात लवकर खड्डे दुरुस्ती करा अन्यथा सिडको कार्यालयावर आंदोलन मोर्चा घेऊन येऊ असा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, चंद्रकांत गुजर, सई पवार, यांनीही मनोगते व्यक्त करीत सिडकोचा निषेध केला.
गौरव गायकवाड, रामेश्वर आंग्रे, योगेंद्र कैकाडी, चंद्रकांत गुजर, किरण दाते,सई पवार,अंजली मानापुरे,प्रतीक्षा लांगी,प्रीती मांडेकर ,मोनिका आवडे , लिना शहारे, समीक्षा पाथरे, हेमा गोतमरे,उज्वला इसापुरे यावेळी उपस्थित होते.