। रोहा । प्रतिनिधी ।
पीक पेरणीची माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदविण्यासाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या निमित्ताने रोहा तालुक्यातील चणेरा सजातील बिरवाडी येथे ई-पिक पाहणी प्रकल्पाबाबत शेतकर्यांमध्ये गावपातळीवरील कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,पोलीस पाटील यांच्यामार्फत गावोगावी बैठक घेऊन जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ई-पिक पाहणी मोबाईल द्वारे होणार असल्यामुळे युवकांना प्राधान्याने माहिती देण्यात आली.
मोबाईलद्वारे शेतकर्यांच्या पिकाच्या पाहणी प्रक्रियेमध्ये शेतकर्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर शेतकर्यांना ई-पीक पाहणीबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच ई-पीक पाहणीचे काम प्रभावीपणे होण्यासाठी तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संगानियो शाखेचे राठोड, चणेरा मंडळ अधिकारी हेमांजी,तलाठी बैकर, विशाल चोरगे, तेजश्री मोरे, रवींद्र आयरे, गिरीष विचारे, हसमुख पवार, अभिजित भोईर, अब्दुल रौफ पित्तु, सुनिल कासार, महेंद्र चिपळूणकर, जितेंद्र जोशी, संजय गोरीवले,बिरवाडी गाव अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकर्यांच्या लाभाकरिता ई-पीक पाहणी योजनेची 100 टक्के अंमलबजावणी करण्यासाठी चणेरा विभागातील शेतकरी बांधवांनी स्थानिक पातळीवरील तलाठी कर्मचारी यांच्या सहकार्याने त्यांच्या पिकाची पाहणी मोबाईलद्वारे करुन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने उपस्थित अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करावयाची याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.