शिव-पनवेल महामार्ग ओलांडणे धोकादायक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पाच वर्षात 23 जणांचा नाहक बळी

। पनवेल । वार्ताहर ।

शिव-पनवेल महामार्गावरील कळंबोली आणि कामोठे परिसरात रस्ता ओलांडताना पाच वर्षात 23 जणांचा बळी गेला असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली आहे. अपघातात 50 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

सायन-पनवेल महामार्गावर जड अवजड वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक वाहन चालक अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे कामोठे, कळंबोली, खांदा वसाहत आणि खांदेश्‍वर मंदिर येथून महामार्ग ओलांडणे धोकादायक झाले आहे. याकडे सरकारी यंत्रणेकडून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version