। तळा । वार्ताहर ।
महाशिवरात्री उत्सवानिमित्त शनिवारी तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर भक्तांचा जनसागर स्वर्गीय हरिभाऊ चांडीवकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सवास सुरुवात झाली. त्यांच्या पश्चात जयहरी सेवा मंडळातर्फे गेल्या चौदा वर्षांपासून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारपेठेतून महाशिवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विलास ठक्कर यांनी भगवान शंकराचे हुबेहुब रूप धारण केले होते.
तळगड किल्ल्यावर भक्तांचा जनसागर
