| कोलाड | वार्ताहर |
संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील खरीप भातपिकाचे बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरु झाली आहे. केरळात दाखल झालेल्या पावसामुळे शेतकरी खरीप पिकाच्या मशागतीसाठी तयारीला लागला आहे. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर नाचणी, वरी तसेच भेंडी, दुधी, मिरची व इतर भाजीची लागवड केली जाते. यासाठी लागणारे बी बियाणे खरेदीसाठी शेतकरी कामाला लागले आहेत.
याशिवाय यावर्षी सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे, यामुळे भातलागवडीपूर्वी कमीत कमी 25 ते 30 दिवस अगोदर भाताची रोपे तयार केली जातात. यासाठी वेळेवर भात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग करीत असतात, यासाठी शेतकरी शेतात ट्रॅक्टर किंवा बैलाच्या सहाय्याने नांगरणी सुरु केली आहे.