गारंबी धरणावर पर्यटकांची गर्दी

Exif_JPEG_420

| आगरदांडा । प्रतिनिधी ।

सलग सुट्टी असल्याने सहलीचा आनंद लुटण्यासाठी तालुक्यातील निसर्गरम्य गारंबी धरणावर व समुद्रकिनारी मोठया प्रमाणात पर्यटक व स्थानिकांची तुफानी गर्दी होऊ लागली आहे. गारंबी धरण शहरापासून 11 किलोमिटर अंतरावर जंगलात आहे. हे नवाब कालीन धरण असून या धरणातून शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरिता बांधले आहे. धरणामधून ओव्हरफ्लो प्रवाहात पोहण्यासाठी पर्यटक आनंद घेण्यासाठी येत असतात. दुधाळ धबधबा पाहिले की धबधब्याखाली बसून चिंब भिजण्याचा मोह आवरता येत नाही. दुसर्‍या बाजूला धुक्याचे अच्छादन असलेले निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय रहात नाही.

Exit mobile version